टोल कर्मचाऱ्यांच्या सतरकेमुळे की अवघ्या अडीच तासात गाडी व गाडी चालकाचा शोध..
उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन…
( ता. प्रतिनिधी रूपाली चाटसे )
उदयनगर दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी रात्री सुमारे 11:45 च्या सुमारास उदयनगर -अमडापूर मध्ये असलेल्या टोल प्लाजा वरील कर्मचारी विशाल तेजराव वानखेडे हे दुपारी चार ते बारा या शिफ्ट मध्ये कामावर होते तरी तब्येत खराब असल्याकारणाने अकरा वाजे सुमारास सुपरवायझर यांची परवानगी घेऊन घरी जात असताना टोल नाक्यापासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर भरधाव कार ने चिरडले.

सदरील घटना ही रात्री 11:44 ते 11: 48 दरम्यान घडली , विशाल वानखेडे हे टोल नाक्यावरून आपल्या घरी अमडापूर कडे चालत जात होते , खामगाव कडून चिखली कडे भरधाव वेगात जाणाऱ्या कार ने विशाल वानखेडे यांना उडवून देत गाडीखाली चिरडले , व गाडी घेऊन गाडी चालक पसार झाला.
सदरील घटनेची माहिती ही अज्ञात वाहन चालकांनी उदयनगर येथील टोल बूथ वरील कर्मचाऱ्यांना दिली तसेच टोलबूथ वरील कर्मचाऱ्यांनी 1033 रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली व विशाल वानखेडे यांना ग्रामीण रुग्णालय चिखली येथे नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी विशाल यांना तपासून मृत घोषित केले,
विशाल यांना ग्रामीण रुग्णालयात सोडून परत आलेले रुग्णवाहिकेचे कर्मचारी व टोल बूथ चे कर्मचारी चर्चा करत असताना त्यांच्या निदर्शनास संशयास्पद अपघात ग्रस्त गाडी क्रमांक MH41AS2207 खामगाव च्या दिशेने टो करून नेल्याचे आढळून आले करिता कर्मचाऱ्यांनी अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना ही माहिती देत गाडीचा पाठलाग करून वैरागड मध्ये सदरील गाडी व गाडी चालक यांना पकडण्यात आले , संशयाप्रमाणे गाडीच्या खालील भागावर रक्ताचे डाग व केस चिपकलेली आढळून आले,
गाडी चालकांनी सुरुवातीला उडवा उडवी चे उत्तर दिली पण विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली,
सुमारे अडीच वाजता सदरील वाहन व वाहन चालक यांना पोलीस स्टेशन अमरापुर येथे नेण्यात आले तरी सकाळी सहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.






