मुंबई, इगतपुरी प्रतिनिधी:सिन्नर मतदारसंघातील टाकेद गटातील आदिवासी तसेच इतर घटकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांचे विश्वासू व कट्टर समर्थक, युवकांचे मार्गदर्शक युवा नेते डॉ. श्रीराम लहामटे यांच्या सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदिवासी सेलच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, त्र्यंबकेश्वर-इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामणजी खोसकर आणि देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोजताई अहिरे यांच्या शुभहस्ते डॉ. लहामटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. लहामटे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.——
बातमीदार: समाधान रोंगटे, इगतपुरी प्रतिनिधी, सारथी न्यूज






