कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपिन दादा कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या तळेगाव मळे येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण तसेच गावातील अनेक विकासकामांचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमात सामाजिक सभागृह (₹10 लाख), बनसोडे वस्ती ते भवर वस्ती रस्त्याचे मजबुतीकरण व खडीकरण (₹10 लाख), ग्रामपंचायत अंतर्गत पथदिव्यांचे उद्घाटन तसेच प्रत्येक कुटुंबासाठी डस्टबिन वाटपाचा शुभारंभ असा विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करण्यात आला.
हा लोकार्पण समारंभ विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सामाजिक सभागृह, रस्त्यांचे मजबुतीकरण, पथदिवे आणि डस्टबिन वाटप या सर्व उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला सुरेश भाऊ जाधव, विशाल गोर्डे, सतिष देवकर, सिध्दार्थ साठे, रोहित कणगरे, प्रशांत संत, दत्तात्रय टुपके, गोरख टुपके, तुकाराम जाधव, नवनाथ जाधव आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✨ या विकासकामांमुळे गावाचा सर्वांगीण विकास होऊन शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे व सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.




