परळी प्रतिनिधी: माणिक बनसोडे (9764710266)
नागापूर गावापासून जवळच असलेल्या वान धरण नदीवर हे धरण असून महाराष्ट्र चे माझी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या हस्ते या वन धरणाचे उद्घाटन झाले. काम पूर्ण झाले आहे. आज या घटनेला साधारण अनेक वर्ष झाले आहे. तेव्हापासून वान धरणाच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. वांधरणाच्या डॅम वर अनेक वृक्ष यामुळे धरणाची मातीची भिंत व पिचिंग याला खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला. सततच्या अतिवृष्टी पावसामुळे हा डॅम पूर्णपणे सांड यावरून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
वन धरणाच्या सांडव्याच्या पायऱ्या जवळील असणाऱ्या पिचिंग चा काही भाग हा अतिवेगात असलेल्या पाण्याच्या लाटा मुळे संपूर्ण भाग खचून गेला आहे. व मातीची भिंत सिमेंटची सुरक्षित भिंत दिसत नाही. यामुळे अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन. पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी.
व होणारा धोका टाळता येईल. यावर शासनाने योग्य वेळी पाऊल उचलल्यास होणारे दुर्घटना टाळता येतील. असे आव्हान बीड जिल्हा प्रशासनाला. भारतीय दलित पॅंथर परळी तालुका अध्यक्ष : माणिकराव बनसोडे यांनी केले आहे.
जर प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल नाही घेतल्यास. बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.





