
इगतपुरी प्रतिनिधी : समाधान रोंगटे |
सारथी न्यूज महाराष्ट्र – प्रगतीशील लेखक संघ, अकोले यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनात नाशिकचे प्रख्यात साहित्यिक कवी मा. यशवंत कुंदे यांना ‘पुरोगामी समजभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंत कुंदे यांनी आपल्या लेखनातून आदिवासी समाज, सामाजिक परिवर्तन आणि मानवी मूल्यांना वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने केले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सलील करसरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रशांत मोरे उपस्थित होते, तर संमेलनाध्यक्षपदी मा. संजय दोबाडे होते.पुरस्कार स्वीकृतीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना यशवंत कुंदे म्हणाले,“हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. समाजपरिवर्तनासाठी लेखणी हेच माझे साधन आहे.”या सन्मानाबद्दल साहित्यिक आणि चाहत्यांकडून यशवंत कुंदे यांचे अभिनंदन होत आहे.




