सातारा शहराच्या विकासाचा नवा टप्पा आता सुरू झाला आहे. पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गाचे काँक्रीटीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या मार्गाच्या कामासाठी 52 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. सातारा शहराच्या विकासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जातील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सातारा, कोरेगाव पंढरपूर यां मार्गावरील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या भागाचे काँक्रेटिकरण व सुशोभीलरण कामाचे भूमिपूजन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये महामार्गाची सुधारणा, रूंदीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार आहे. खडीकरण व एम 40 मध्ये काँक्रेटिकरण करणे, बंदिस्त गटारे, लहान पुलाचे बांधकाम करणे, पार्किंग सोय व फुटपाथ बांधणे, चौकांचे सुशोभिकरण करणे तसेच आकर्षक पथदिवे व विद्युतीकरण करणे ही या कामाची वैशिष्ट्ये आहेत.ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातार्यातील जुना आरटीओ चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक रस्त्याचे काम झाले त्यापद्धतीने पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गाचे काम करण्यात येणार आहे. काँक्रेट मेनकॅरेजवे तसेच दुतर्फा स्ट्रीट लाईट, डेकोरेटिव्ह लॅम्प बसवण्यात येणार आहेत.
यां मार्गाचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याने पहाटे फिरण्यासाठी येणार्या नागरिकांची सोय होणार आहे. फळविक्रेत्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याने वाहतुकीस अडथळा येणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गासाठी 52 कोटींचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते, धनंजय जांभळे, जयेंद्र चव्हाण, अॅड. विक्रम पवार, विजय देसाई, अरूण देसाई आदि उपस्थित होते.







