प्रतिनिधी/ आकाश गेडाम. राजुरा – आठवडी बाजार सोमनाथपूर येथील सार्वजनिन शौचालयाला दरवाजे नाहीत. २ वर्षापासून शौचालयाचे दरवाजे तुटून असून नगर परिषद त्याचा कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदरच्या शौचालयाचा काहीही उपयोग नाही. या अभावामुळे नागरिक त्रस्त होऊन वॉटर फिल्टर जवळ शौचास जात आहेत. या मुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे आणि स्वच्छतेचा अभाव कमी होत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. याच्या मुळे नागरिकांना परिसानी होत असल्याचे दिसून येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार नगर परिषद आहे असा आरोप करत आदिवासी टायगर सेनेचे जिल्हा युवा उपाध्यक्ष रवींद्र आत्राम नगर परिषदेला निवेदन देऊन शौचालयास दरवाजे लाऊन योग्यरितीने स्वच्छता ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.









