खडी :
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी विशाल बारनीस व शशी पुरभे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते अमित राज ठाकरे व अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष मनोजजी चव्हाण व उपाध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरणाचा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. संजय वाढविंदे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
— खडी प्रतिनिधी : सगीर शेख





