प्रविण कुंटे उमरखेड तालुका प्रतिनिधी मो 9404734314
✒✒📝
उमरखेड तालुका ढाणकी :- उन्हाळा हिवाळा व पावसाळा असो ढाणकी वासीयांच्या जणू पाचवीलाच पुजलेली पाणीटंचाई दिवसेंनदिवस तीव्रच होताना दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी तुडुंब भरून ओव्हर फ्लो होत असताना देखील येथील पाणीटंचाईची समस्या पावसाळ्यात देखील कायम आहे पावसाळा असून देखील येथील नळाला सध्या १२ ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
त्यामुळे नळ आले की येथील प्रत्येक नागरिकांची पाण्यासाठी धडपड सुरू होते आपल्याला मुबलक पाणी मिळणार नाही मिळालेले पाणी पंधरा दिवस पुरणार नाही अशा धडपडीमध्येच आजवर नळाचे पाणी भरताना विद्युत शॉक लागून येथील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
याच घटनेची पुनरावृत्ती ढाणकी येथे २ नोव्हेंबर २०२५ रविवार रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. नळाला पाणी आले पाणी वाया जाऊ नये म्हणून वर्षा अनंता डांगे राहणार ढाणकी ही ५० वर्षीय महिला नळाची विद्युत मोटर लावून पाणी भरत होती पाणी भरत असताना अचानक ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली तेव्हा वर्षा डांगे ह्या नळाच्या विद्युत मोटरी जवळ पडलेल्या आढळून आल्या नागरिकांनी विद्युत्य सप्लाय बंद करून लगेच त्यांना रुग्णालयात नेले परंतु त्यांचा मृत्यू झाला.
वर्षा डांगे या आशा सेविका म्हणून ढाणकी आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले आहेत त्यांच्या मृत्यूने ढाणकी येथे शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना माहीत होताच बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, बीट जमादार मोहन चाटे, सुदर्शन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली ढाणकी विद्युत वितरण विभागाचे अधिकारी आत्राम व कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.






