प्रतिनिधी/आकाश गेडाम ट्राफीक चा मामला हळूहळू बोंबला….भाग १ दारु प्या, वाटसरुना उडवा आणी पळून जा!राजुरा परिसरातील अपघाताची श्रृंखला केव्हा थांबणार?
राजुरा पोलीस आणी त्या अतंर्गत कार्यरत वाहतुक विभागांचा असंवेदनशील कारभार, निष्क्रीयता पैसे खाण्याची ओढ यामुळे राजुरा शहर व परिसरात नित्यनेमाणे लागोपाठ होणारे अपघात नव्हे अपघाताची श्रृंखला केव्हा बंद होणार? असा यक्ष प्रश्न राजुराकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.राजुरा पोलीसच्या वाहतुक विभागाचे वाहतुकीवर नियंत्रण संपल्याने गेल्या दोन महिन्यात अनेक निरपराध नागरीकांचे हकनाक जीव गेले आहेत. घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने अनेक स्त्रियाचे संसार उघड्यावर पडले आहे. अनेक जण आईला मुलांना मुकले आहे. परंतु राजुरा पोलीसच्या वाहतुक विभागाला काहीच चिंता नाही. राजुऱ्याचा ट्राफीक विभाग केवळ आणी केवळ वसुली करण्यात व्यस्त आहे. व त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण उरलेले दिसत नाही.मागील दोन महिन्याचा कार्यकाळ बघितल्यास झालेल्या अपघातात १५ ते २० नागरीकांचा हकनाक व दुर्देवी मृत्यू झाला आहे. राजुरा शहर व परिसरात जणू काही अपघाताची श्रृंखलाच सुरु झाल्याचे विदारक दृष्य जनतेला पहायला मिळत आहे.दिनांक २२ ऑगष्ट रोजी कापनगाव गावाजवळ ट्रक आणी ऑटोच्या अपघातात सहा नागरीक जागीच ठार झाले. रेफर केलेल्या पैकी एक इसमही मरण पावला लगेच दुसऱ्या दिवशी एका बाईकस्वाराचा कापणगाव जवळ अपघाती मृत्यू झाला कापणगाव अपघातात पाचगांव येथील रविंद्ध बोंबडे, शंकर पिपरे, वर्षा मांदाळे, तनु पिंपळकर, ताराबाई पापुलवार व अॅटो चालक प्रकाश मेश्राम यांनी आपला जीव गमावला त्यांनतर वरूड रोड वर झालेल्या ट्रक व ट्रेलरच्या अपघातात. राजुरा येथील एकाच कुटुंबातील दोन इसमाचा झालेला मृत्यू. उप जिल्हा रुग्णालसमोर दस्तुरखुद ठाणेदाराच्या डोळ्यादेखत झालेला एका पित्याचा मृत्यू अशी एक ना अनेक अपघाताची उदाहरणे देता येईल परंतु पांढरे डगले घालणाऱ्या या ट्राफीक पोलीसांना त्याचे काही देणे घेणे नाही ढोंगी बगळे बनून मासे खाण्याचा असूरी आंनद ते लूटत आहेत.कापनगाव येथे अपघातस्थळी ८ ते ९ नागरिकांचा जीव जाईपर्यंत तिकडे न फिरकनारे ट्रॅफिक पोलिस अपघातानंतर काही दिवसात अपघात स्थळी वसुली करतांना आढळले. येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी वाहण वाहन समोर गेल्यावर चालानसाठी फोटो घेण्याचा निर्लज्ज प्रकार त्या विकाणी करतांना त्यांना थोडीशीही लाज वाटली नाही. या ट्राफीकच्या टोळक्याला कोणी लगाम घालणार आहे की नाही?याचे उत्तर कोण देणार?









