आजचा काळ डिजिटल. आपल्या मोबाईलवर रोज नवीन व्हिडिओ, फोटो, मेसेज आणि बातम्या येतच असतात. पण आता या माहितीच्या महासागरात खरे आणि खोटे ओळखणे अधिक कठीण झाले आहे. कारण गेल्या काही महिन्यांत Deepfake Technology चा वापर झपाट्याने वाढला असून त्याचा गैरवापर सर्वात जास्त होत आहे.
सेलिब्रिटींचे नकली व्हिडिओ – ‘हे खरंच बोलले का?
सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहून आपल्याला आधी वाटतं,
“अरे हा तो कलाकार खरंच बोलतोय!”
पण प्रत्यक्षात तो पूर्ण व्हिडिओ बनावट असू शकतो.
- काही व्हिडिओमध्ये प्रसिद्ध कलाकार नकली उत्पादनांची जाहिरात करताना दिसतात
- काही व्हिडिओमध्ये राजकीय मतं आणि वक्तव्ये चुकीच्या संदर्भात दाखवली जातात
- आणि काही वेळा बदनामी करण्यासाठी मुद्दाम अश्लील किंवा लाजिरवाणे कंटेंट तयार केला जातो
आणि हे सर्व इतक्या कौशल्याने केलं जातं की पहिल्याच पाहणीत खोटं ओळखणं जवळपास अशक्य.

आवाजाची नक्कल करून फसवणूक – सर्वात मोठा धोका
आता फक्त व्हिडिओ नाही, तर आवाजही कॉपी करता येतो.
काही सेकंदांचा आवाज —
व्हॉट्सअॅप व्हॉईस मेसेज, रील्स वर बोललेलं, किंवा अगदी फोनवरील आय हॅलो…
इतकं पुरेसं असतं.
✅ सायबर गुन्हेगार त्या आवाजाची कॉपी बनवतात
✅ आणि नंतर कुटुंबीय, मित्र किंवा ऑफिसमध्ये फोन करून पैशांची मागणी करतात
✅ समोरच्याला आवाज ‘ओळखीचा’ वाटतो
✅ आणि लोक विचार न करता पैसे पाठवतात
अशी प्रकरणं आता भारतातही वाढत आहेत.
तर मग आपण स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे?
१) कोणत्याही व्हिडिओ किंवा फोटोवर ताबडतोब विश्वास ठेवू नका
पहिले त्याचा स्त्रोत तपासा.
२) पैशांची मागणी आली तर फक्त आवाजावर विश्वास ठेवू नका
कधीही व्हिडिओ कॉलवर ओळख निश्चित करा.
३) सोशल मीडियावर जास्त वैयक्तिक माहिती शेअर करू नका
फोटो, आवाज, व्हिडिओ हे सगळं डेटा आहे – आणि डेटा म्हणजेच धोका.
४) कुटुंबात एक पासकोड/कीवर्ड ठेवा
एखाद्या संकटात तो कीवर्ड सांगितल्याशिवाय काहीही कृती करू नका.
५) एखादी बातमी, अफवा किंवा व्हिडिओ पाहिला?
ताबडतोब पुढे शेअर करू नका.
पहिले Fact-Check करा.
प्रतीनिधी – वैभव चंदने, नवी मुंबई







