(उमरखेड मधून चालतो तलाठी अधिकारी यांचा कारभार )
प्रवीण कुंटे उमरखेड तालुका प्रतिनिधी मो 9404734314
उमरखेड तालुक्यातील बाळदी गावातील तलाठी मुख्यालय न राहता सर्व कारभार उमरखेड मधून पाहतो असतो त्यामुळे बाळदी गावातील नागरिकांची हेळसांड होत असल्याने तलाठी हा गावात सातत्यपूर्ण कधीही प्राधान्य देत नाही. येतो तो फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी याच अनुषंगाने गावात आपली हजरी लावतो.
त्यामुळे गावातील नागरिकांना तलाठी यांचा संपर्क नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो .
नागरिकांना काही कागदपत्रासाठी गरज पडल्यास त्यांना उमरखेडला ये – जा करावे लागते . त्यामुळे अनेक वेळा प्रहारच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा पत्र व्यवहार केला तक्रारी पण दिल्या . परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक याकडे लक्ष दिले नाही अधिकाऱ्यांच्या मनमानी व निष्काजीपणामुळे नागरिकांच्या जीवाची खेळ केला जात असल्याची भावना जनतेत आहे.
गावकऱ्याचे म्हणणे आहे की, तलाठी कार्यालय पूर्णपणे गाजर गवताने भरलेला आहे. तसेच ग्रामस्थांनी मागणी केली आहे की प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन संबंधित तलाठी अधिकारी कार्यालयामध्ये हजर राहायला पाहिजे काही कागदपत्रासाठी जेणेकरून गावातील नागरिकांना अडचण होणार नाही त्याची दक्षता घ्यावी आणि निष्काळाची अधिकाऱ्यावर कारवाई करावी..






