
दुघाळा ग्रामीण प्रतिनिधी // तुराबपठाण
आज 3 डिसेंबर रोजी जगभरात हा अपंग दिवस म्हणून साजरा केला जातो अपंगाचे हक्क अपंगाचे जाणीव करणे हा उद्देश असतो.
जागतिक अपंग दिनाला संयुक्त राष्ट्रांनी १९९२ मध्ये प्रोत्साहन दिले होते.विकलांगलोकांचे हक्क, आदर आणि काळजी यांविषयी लोकांना अधिक जागरूक करणे तसेच अपंग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश होता.
पण आज खऱ्या उद्देशाने पाहिले गेले तर जगभरात आणि महाराष्ट्र जिल्ह्या व ग्रामीण भागात कित्येक अपंग व्यक्ती हा लाभापासून वंचित आहेत आणि दूर आहे भारत सरकार अपंगाचा हक्क त्यांच्यापर्यंत सुद्धा जाऊ देत नाही मध्येच की त्यांचा हक्क कुठेतरी गायब होतो व ते दिव्यांग व्यक्ती त्यांच्यापासून वंचित राहतात.





