अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शाखा पेण यांच्या वतीने वळक येथील शाळेला “आदर्श शाळा” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, उपक्रमशीलता व सर्वांगीण विकासाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.
बुधवार, दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता पेण येथील आगरी समाज हॉल येथे हा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वळक शाळेला मिळालेल्या या सन्मानामुळे संपूर्ण परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल शाळेच्या शिक्षकवृंदाचे, व्यवस्थापनाचे व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.
प्रतिनिधी : वैभव चंदने | सारथी महाराष्ट्राचा