
स्वच्छ सुंदर आदर्श शाळा पुरस्कार आजरा तालुक्यातील मडिलगे हायस्कूल मडिलगे देणेत आला.
आजरा / चंदगड:- सारथी महाराष्ट्राचा न्यूज,
मडिलगे ( ता. आजरा )दरवर्षी आजरा गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील शाळांना गडिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना गडहिंग्लज यांचे वतीने स्वच्छ सुंदर आदर्श शाळा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार आजरा तालुक्यातील मडिलगे हायस्कूल मडिलगे या शाळेला देण्यात आला आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर रमेश वस्कोटी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर लाभले होते व अध्यक्षस्थानी माननीय श्री के बी पवार सर माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघ कोल्हापूर हे होते. याप्रसंगी स्वागत व प्रस्ताविकामध्ये मा. श्री राजेंद्र खराटे सर माजी अध्यक्ष गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघटना यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले गेले 26 वर्ष अशा पुरस्कारांचे वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघटनेमार्फत केला जातो आहे असे सांगितले. संघाच्या कार्याची ओळख करून देताना संघटनेचे सचिव माननीय श्री जयसिंग पाटील सर यांनी सांगितले की कोणत्याही शिफारसी शिवाय व कोणतेही प्रस्ताव न मागवता असे पुरस्कार प्रदान केले जातात . गुणवंत विद्यार्थीचा ही गुणगौरव करण्यात आला. आदर्श शाळा आणि आदर्श मुख्याध्यापक यांना ही सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील आदर्श मुख्याध्यापक म्हणून दाभिल हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री संजय देवेकर यांना सन्मानित करण्यात

