
बोंजुर्डी येथील श्रेया पाटील कथाकथन स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम
आजरा / चंदगड – सारथी महाराष्ट्राचा न्यूज,
बोंजुर्डी ता.चंदगड येथील कन्या व विद्या मंदिर अलबादेवी शाळेची विद्यार्थिनी श्रेया राजाराम पाटील हिने जिल्हा परिषद कोल्हापूर वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कथाकथन विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावले ने श्रेयावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सदर स्पर्धेत श्रेयाची शब्दावरील पकड,प्रभावी शब्दफेक, व प्रसंगानुरूप चेहऱ्यावरील भावना यामुळे तिचे सादरीकरण अत्यंत उत्कृष्ट झालेने तिने उपस्थित रसिकांची व परीक्षकांची मने जिंकली.कथेतील चढ उतार व आवाजातील बदलातून तिचे सादरीकरण अत्यंत प्रभावी झाले.यामुळे तिला जिल्हास्तरावर अव्वल स्थान मिळाले. यासाठी तिला आई,वडील शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.



