• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बॉक्साईट वाहतुकीच्या धूळ–आवाजात शाळकरी मुलांचे भवितव्य धोक्यात; मानवाधिकार आयोगाचा थेट हस्तक्षेप, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

Rakesh Chilbe by Rakesh Chilbe
January 11, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

रत्नागिरी|दापोली|प्रतिनिधी दापोली तालुक्यातील मांदिवली गावात उर्दू शाळेजवळ सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचला असून आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

सातत्याने सुरू असलेल्या ओव्हरलोड डंपरमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि तीव्र आवाज निर्माण होत असून याचा थेट फटका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्या असून वर्गात शांततेत अभ्यास करणे कठीण झाले आहे. शाळेसमोरून वेगाने धावणाऱ्या जड वाहनांमुळे अपघाताचा धोका कायम असून पालकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे.

Ad 1

प्रस्तावित खाण प्रकल्प शाळेच्या अत्यंत जवळ असल्याने मुलांच्या दीर्घकालीन शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या संदर्भात स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने भावेश कारेकर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे थेट तक्रार दाखल केली.

प्राथमिक तपासणीत शाळकरी मुलांचे मूलभूत मानवी हक्क धोक्यात असल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करत आयोगाने मानवाधिकार संरक्षण अधिनियम, १९९३ च्या कलम १२ अंतर्गत या प्रकरणाची दखल घेतली आहे.आयोगाने रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांना नोटीस बजावून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोन आठवड्यांच्या आत कारवाईचा सविस्तर अहवाल (Action Taken Report) सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Ad 1

शाळकरी मुलांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शिक्षणाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी स्पष्ट अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.या प्रकरणानंतर आता जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी कोणती ठोस पावले उचलतात, याकडे मांदिवली गावासह संपूर्ण दापोली तालुक्याचे लक्ष लागले आहे.सौजन्य : विद्या वंदा न्यूज साप्ताहिक

बॉक्साईट वाहतुकीच्या धूळ–आवाजात शाळकरी मुलांचे भवितव्य धोक्यात; मानवाधिकार आयोगाचा थेट हस्तक्षेप, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

Ad 1

RelatedPosts

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

Diese besten 17 Verbunden Casinos inoffizieller mitarbeiter RoyalGame Anmeldebonus Vergleich

Jetzt Casino 888 Slots für nüsse denksport

Previous Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायत आजरा तालुका तर्फे ग्राहक जागरण मास निमित्त मार्गदर्शन..

Next Post

श्री. अशोकअण्णा चराटी, यांची दि आजरा अर्बन बँक लि., आजराच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याने सत्कार.

Related Posts

Blog

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

January 19, 2026
266
Blog

Diese besten 17 Verbunden Casinos inoffizieller mitarbeiter RoyalGame Anmeldebonus Vergleich

January 19, 2026
0
Blog

Jetzt Casino 888 Slots für nüsse denksport

January 19, 2026
0
Blog

धरणगाव नगर पालिका जवळ विजेच्या तारात अडकला विदेशी कोकाटेल पोपट

January 19, 2026
72
न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

3
पिंपळखुटे येथे लक्ष्मीआई याञेनिमित्त माजी आमदार धनगेकर,येवला नगराध्यक्ष राजु भाऊ लोणारी यांची हजेरी

77
Next Post
श्री. अशोकअण्णा चराटी, यांची दि आजरा अर्बन बँक लि., आजराच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याने सत्कार.

श्री. अशोकअण्णा चराटी, यांची दि आजरा अर्बन बँक लि., आजराच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याने सत्कार.

ताज्या बातम्या

Lovgivningen bag spil Hvad skal du vide

January 19, 2026

पालघरमध्ये प्रकल्पांविरोधात जनसागर उसळला!

January 19, 2026

Diese besten 17 Verbunden Casinos inoffizieller mitarbeiter RoyalGame Anmeldebonus Vergleich

January 19, 2026

Popular Stories

  • शिरूरमध्ये मृत्यूच्या दारातून परतला आठ वर्षांचा आदर्श – डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांनी वाचला जीव…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ब्रेकिंग न्युज… 💥💥शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात कमळ 🪷

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भाई भाई चित्रमंदिर समोर दुकाने पेटली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In