24 वर्षाची धार्मिक आणी सांस्कृतिक परंपरा कायम…
महाशिवरात्री म्हटले की, मिरज आणि पंचक्रोशातील शिवभक्तांना एकच आस लागते ती म्हणजे मिरज मध्ये पुरातन काशीविश्वेश्वर मंदिरात आयोजित होत असलेल्या भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाची गेली 24 वर्षे अखंड परंपरा असणारा हा महोत्सव आता साता समुद्रापार पोहोचला आहे मिरजेतील ज्येष्ठ समाजसेवक समर्थ भक्त माधव गाडगीळ आणी त्यांच्या परिवारासह मित्र मंडळींनी 2002 साली एका छोट्याशा कीर्तनाने सुरु केलेला हा महोत्सव आता वटवृक्षा प्रमाणे बहरला आहे चार दिवस चालणाऱ्या या मोहोत्सवामध्ये अखंड नाम जपासह विविध सांस्कृतिक आध्यत्मिक तसेचसमाज प्रबोधनात्मक कीर्तने आयोजित केली जातात. प्रथम पासूनच या कीर्तन मोहोत्सवाचे जनक माधवराव गाडगीळ हे मुळातच आध्यत्मिक प्रवृतीचे असेल्याने या या कीर्तन मोहोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी आणी त्यांच्या मित्रमंडळींनी एक वेगळा आदर्श समाजामध्ये घालून दिला आहे मिरजेतील पुरातन असे श्री काशी विश्वेश्वर देवस्थान च्या प्रांगणात आयोजित होणाऱ्या या मोहोत्सवाचे वेगळेपण हे दर वर्षी वेगळे असतें या मोहोत्सवामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवले जाते यामध्ये अगदी डोळ्या पासून आयुर्वेदिक आणी हाडांचे वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी असतात डोळ्यांची मोफत तपासणी हाडाचा ठिसूळ पणा त्याचबरोबर सर्व प्रकारच्या आजारावर आयुर्वेदिक उपचारांचे महत्व इथे नागरिकांना पटवून दिले जाते. 12 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या या मोहोत्सवाची सांगता महाशिवरात्री ला होते
