रिसोड नगरपरिषदेत ‘बोगस आयडी’ने २० लाखांचा अपहार; कर अधीक्षकाचा कारनामा?
एका कर्मचाऱ्यांनी नागरिकाकाकडुन करमालमत्ता वसुलीच्या नावाखाली बनावट आयडी करून लाखो रुपयाचा अपहार केल्याची घटना समोर आली याबाबत मुख्याधिकारी शेवदा यांनी चौकशीसाठी समिती नेमुण यात कोण महाभाग सामिल आहेत त्याची चौकशीतुन पुढे येणार आहे अशी माहीती घेत आहेत.
नगरपरिषद प्रशासकीय वर्तुळात सध्या एका मोठचा आर्थिक घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या एका कर अधीक्षकाने चक्क कर निरीक्षकाच्या बोगस आयडीचा वापर करून १५ जुलैपूर्वीपासून तब्बल २० लाख रुपयांचा अपहार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी समिती नेमली असून, शहरात या
विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमका प्रकार काय मिळालेल्या
नगर परिषद रिसोड,
माहितीनुसार, रिसोड नगरपरिषदेतील कर अधीक्षकाने कर निरीक्षकांच्या लॉगिन आयडीचा अनाधिकृत वापर केला. शहरातील सामान्य नागरिकांनी आपला मालमत्ता कर प्रामाणिकपणे भरला, मात्र या रकमेची नोंद अधिकृत दप्तरी न करता खासगी स्तरावर परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. अनेक नागरिकांनी कर भरूनही त्यांच्या नावावर थकबाकी दिसत असल्याने आणि कर निरीक्षकांनी स्वतः तक्रारी केल्याने हा प्रकार उघडकीस आला. तपासाचे चक्र फिरले : मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य लेखापालांच्या
नेतृत्वाखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला पुढील ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून २० लाख रुपयांची अफरातफर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीअंती जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि नागरिकांची फसवणूक झालेली रक्कमही वसूल केली जाईल.ह्र सतीश शेवदा, मुख्याधिकारी, नगरपरिषद रिसोड
