
वर्धा प्रतिनिधी,
वर्धा:-
अमरावती ते नागपूर महामार्गाने तळेगावमार्गे येत असलेला दारुसाठा पोलिसांनी पकडला. पोलिसांनी वाहनासह ५ लाख १५ हजार २०० रुपयांचा दारुसाठा जप्त करीत दोघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली.
तळेगाव हद्दीतून दारुची तस्करी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी नाकाबंदी केली असता एमएच २७ एसी ८८७२ क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसंनी भिष्णूर फाट्याजवळ नाकाबंदी केली होती. कार येताना दिसताच पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुसाठा मिळून साठा आला.
पोलिसांनी याप्रकरणी मदन जगन्नाथ कैथवास (रा. मायानगर, अमरावती) कलीम चाउस अली चाउस गुन्हे (रा. अमरावती) याला अटक केली. तसेच प्रफुल्ल जयस्वाल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, संतोष दरगुडे, अरविंद येणूरकर, भूषण निघोट, धर्मेंद्र अकाली, पवन पन्नासे, रवी पुरोहीत, हर्षल सोनटक्के, विनोद न कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.
Discussion about this post