स्वतंत्र उमेदवार खेमराज भाऊ नेवारे यांनी केली अर्जाची उचल
समीर बल्की -तालुका प्रतिनिधी.
भिसी:- आरमोरी विधानसभेसाठी खेमराज वातुजी नेवारे हे एक उमदे व्यक्तिमत्व,नवीन चेहरा, नवीन संकल्प, युवकांसाठी खंबीर नेतृत्व, निर्भीड व्यक्तिमत्व, शेतकरी मित्र आहेत.बेरोजगारीच्या समस्येवर प्रामुख्याने लक्ष घालणारे युवा नेतृत्व, शेतकऱ्यांचे, सुशिक्षित बेरोजगारांचे, लघु उद्योजकांचे, महिलांचे, आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडविण्याचा त्यांनी विडा उचलून स्वतः राजकीय क्षेत्रात उडी घेतली.
व आरमोरी विधानसभा क्षेत्राचा नक्कीच विकास करणार या उद्देशाने खेमराज वातुजी नेवारे यांनी उपविभागीय कार्यालय देसाईगंज येथून शासकीय शुल्क भरून विधानसभा उमेदवारी अर्जाची उचल केली.त्यांच्या या धाडसी वृत्तीची व निर्णयाची आरमोरी विधानसभा येथील जनता यावेळेस नक्कीच विचार करेल यात तिळमात्र शंका नाही.याप्रसंगी खेमराज वातुजी नेवारे यांच्या सोबत नरेश वासनिक, वैभव परशुरामकर व अनेक समर्थक उपस्थित होते.
Discussion about this post