पिंपळगाव येथे कापरे वस्ती जवळील वळणावर आमच्या भावा-बहिणीचा ऊसाने भरलेल्या तीन ट्रॉली खाली चेंगरून दुर्दैवी मृत्यू झाला..!!या घटनेला आज ४महिने पूर्ण होत आहेत…. सदर घटनेला जबाबदार असलेला आरोपी व आरटीओ पासिंग नसलेला तीन ऊसाने भरलेल्या tracter आम्हाला चिरडून मानवतेला काळींबा फासत फरार झाला..आमचा गुन्हा काय होता..?
आम्ही गावात १ किलो मटण आणि पाणीच आणायला गेलो होतो….!!आम्हाला न्याय पाहिजे आमच्या मृत्युला जबाबदार असलेला आरोपी व इतर वाहने मोकाट फिरत आहेत आमच्या आई वडिलांचा आम्ही दोघेच आधार होतो आम्हाला न्याय देण्यासाठी दिनांक २१ जानेवारी रोजी माझे आई वडील यवत पोलिस स्टेशन बाहेर उपोषणाला बसणार आहोत.
तुम्हीही या उपोषणात सहभागी व्हा !!आज आमचा बळी गेला आहे…!! कदाचित पुढील बळी…..?
चला एक लढाई बेशिस्त गुराळ धारकांन विरूद्ध आणि अन्याया विरुध्द लढू !!आयु सिद्धार्थ आणि दिक्षाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरटीओ पसिंग नसलेल्या व नियम बाह्यपद्धतीने होत असलेली ऊस वाहतूक याला कोठेतरी प्रतिबंध करू !!आणि तालुक्यातील बेशिस्त वाहन धारकांना वठणीवर आणू या
!!या दुर्दैवी अपघाती हत्येस कारणीभूत ठरलेले आरोपी
१) बेशिस्त गुराळ धारकांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्या विरोधात कारवाई.
– ४महिन्या पासून ही केस दाबण्यात आलेल्या व्यक्ती विरोधात-
अपघात स्थळावर किंवा आसपास असलेले५सीसीटीव्ही मधील फुटेज डिलीट करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे-
अपघात ठिकाणावरील प्रत्यक्षदर्शनीना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे
२) ससून हॉस्पिटलगंभीर जखमी अवस्थेत दिक्षाला रात्री११:००ते११:३० दरम्यान ससून मध्ये दाखल करण्यात आले..!! परंतु प्रत्यक्षात उपचारालासुरुवात दुसऱ्या दिवशी पहाटे ४:२४ला करण्यातआली.. असे का ?
तिला व्हेंटिलेटर, डायलिसिस ही सुविधा का ?पुरविण्यात आली नाही ?
३) तालुक्यातील सर्व गुराळ धारक व सर्व कारखान्याचे ट्रॅक्टर व ट्रॉली- आरटीओ पासिंग का ? नाहीत.- तीन ट्रॉली भरून ऊस एकाच ट्रॅक्टर जोडून वाहतूक करणे कोणत्या नियमात बसते.-
अशा बेशिस्त वाहन धारकांना परवाना कोणीदिला ? त्यांच्या हातात तीन ट्रॉली भरून ऊस वाहतूक करण्यासाठी कोणी सांगितलेआयु सिद्धार्थ आणि दिक्षा यांच्या “अपघाती हत्येस” कारणीभूत ठरलेल्या सर्वांना कठोर शासन झाले पाहिजे
आणि..!! या सर्वांना वाचवण्याचा प्रयत्नकरणाऱ्या वर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा फक्त तीन दिवस वाघ होऊन जगा..!!- परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरमी आयु सिद्धार्थ आणि दिक्षा यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे.
तुम्हीही सर्व फुले शाहू आंबेंडकर प्रेमींनी एकजूट होऊन..या गुराळ धारकांची मुजोरी मोडून काढण्यासाठी आयु, सिद्धार्थ आणि दिक्षा यांना न्याय मिळवून देण्यासाठी२१जानेवारी पासून होत असलेल्या” आमरण उपोषणात” सहभागी व्हावे असे मी आपणास विनंती करते अहो..
!! आपल्या दारात एखाद्या परक्या मुलाला ठेस लागली तर आपण पळत पळत घरात जातो आणि त्या परक्या मुलांच्या अंगठ्यावर हळद टाकून त्याच्या होणारा रक्तस्त्राव थांबवतो..आणि..
!! येथे तर तीन ट्रॉली ऊसाने भरलेला ट्रॅक्टर तुम्ही गायब करता?आणि..!! वर प्रत्यक्षदर्शीना तुम्ही धमकावता?आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज डिलीट करता?अरे..!! लाज वाटली पाहिजे…..देव न करो तर..? उद्या ही वेळ तुमच्यावर आली तुमच्यामधली मानवता संपली का माणुसकी थोडीतरी समाजा विषयी संवेदना दाखवा !!
येळकोट,,,, येळकोट !!!!जय मल्हारजय सत्यशोधक जय भीम जय भारत जय संविधानशिवमती.
सारिकाताई भुजबळत्रिदल महिला शक्ती आघाडी जिल्हाध्यक्षा, पुणे रा. जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा, दौंड ९९२३९२३४२६
Discussion about this post