जयसिंगपूर प्रतिनिधी/
जयसिंगपूर मध्ये ३१ जानेवारी पासून सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या जंयती निमित्त शरद सहकारी साखर कारखाना लि. नरंदे, शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य ८ वे शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन जयसिंगपूर येथील केले असलेची माहिती शरद सिद्धेश्वर मंदिरासमोर होणार असल्याची माहिती आमदार वशरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर व स्कायस्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शरद कृषीप्रदर्शनाचे आयोजन दि.३१ जानेवारी ते दि.०३ फेब्रुवारी रोजी केले असून प्रदर्शन सकाळी १० वाजले पासून रात्री ९ वाजेपर्यत खुले राहणार आहे. प्रदर्शनासाठी सर्वाना विनामुल्य प्रवेश राहणार आहे.
या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी औजारे, बि-बियाणे, खते व जंतूनाशके, जलसिंचनाच्या पध्दती, ठिबकसिंचन, टिश्युकल्चर, कृषीव्यवस्थापक, शेती अर्थपुरवठा, बॅकींग इन्श्युरन्स, मार्केटींग व्यवस्थापन, रोपवाटीका (नर्सरी), पाणी व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, अपारंपारीक उर्जा, मत्स्य उत्पादन, रेशीम उद्योग, सेंद्रीय शेती याचबरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक, पॅकेर्जीग पध्दती या माहीतीबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालूका कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंर्तगत येणा-या महाविद्यालयाकडून विविध प्रात्यक्षिके दाखविले जाणार आहेत शेतीत नवीन प्रयोगकरणा-या शेतक-यासाठी आधुनिक कृषी माहीतीपटे दाखविली जाणार आहेत. याचं बरोबर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी प्रदर्शनामध्ये दि. १ ते २ फेब्रुवारी या कालावधीमध्ये जातीवंत जनावरे, ऊसपीक व इतर पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव, खिचडी महोत्सव यांचे आयोजन केले आहे. व दि. ३ रोजी कॅट व डॉग शो स्पर्धा यांचेही आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या शेतक-यांनी आपली जनावरे तसेच पिकाचे नमुने यांच्या नोंदी कराव्यात.
बदलत्या तंत्रज्ञानाची माहीती करून घेण्यासाठी व शेतीतील आधुनिक बदल स्विकारण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा करणेसाठी तसेच ऊस उत्पादनामध्ये विक्रमी वाढ करणेसाठी हे प्रदर्शन शेतक-यांसाठी पर्वणी ठरणार असल्याने चार दिवस चालणा-या या कृषीप्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा व या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व स्कायस्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत यांनी केले आहे.
सदर पत्रकार परिषदेसाठी प्रकाश पाटील टाकवडेकर, सुभाषसिंग रजपूत, कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. प्रकाश बसगोंडा पाटील, श्री. आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर, श्री. सुभाषसिंग गोपाळसिंग रजपूत, श्री. अविनाश आप्पासो खंजिरे, श्री. पोपट आण्णासो भोकरे, श्री. दशरथ बळवंत पिष्टे, श्री.शिवगोंडा कलगोंडा पाटील, श्री. अभिजीत बबन भंडारी, श्री. लक्ष्मण भरमू चौगुले, श्री. आप्पासाहेब आण्णा चौगुले, श्री. संजय धुळाप्पा बोरगांवे, श्री. रविकांत पराप्पा कारदगे, श्री. आण्णासो विरूपाक्ष सुतार, श्री. गुंडा शंकर इरकर, श्री. रावसाहेब आप्पा कुंभोजे, श्री. विद्यासागर धनपाल मरजे, मा.सौ. संगिता अजित उपाध्ये, मा. सौ. त्रिशला संजय नांदणे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भुपाल आदिनाथ आवटी, जनरल मॅनेजर (ॲग्री.) रमेश गंगाई उपस्थित होते.
Discussion about this post