किनवट(ता.प्र)प्रतिनिधि शेख मोईन.
गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वार्ड क्रमांक 5 मधील हबीब कॉलनी आणि पेटकुले नगर परिसरातील नागरिकांना उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत असल्याने येथील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
नागरिकांनी ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
Discussion about this post