प्रतिनिधि:- सुरज पाटील
कोटक महिंद्रा बँक शाखा टेंभुर्णी मार्फत व्हॅलेंटाईन डे अनोख्या पद्धतीने साजरा श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय केम् तालुका करमाळा या ठिकाणी खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. या वेळी कोटक महिंद्रा बँक शाखा टेंभुर्णी चे लोकेशन सेल्स मॅनेजर श्री पांडुरंग चिवडे यांचा सत्कार श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय केम यांचे प्राचार्य यांनी केला.


कोटक महिंद्रा बँकेच्या सामाजिक कार्याची माहिती श्री सुरज पाटील व श्री पांडुरंग चिवडे साहेब यांनी बोलताना दिली


शाळेला इथून पुढे भविष्यात ही असेच सामाजिक उपक्रम राबवले जातील याची ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी कोटक महिंद्रा बँक टेंभुर्णी शाखेतील श्री पांडुरंग चिवडे, श्री सुरज पाटील, श्री विजय ओव्हाळ, पितांबर पाटील, अंकुल नवले अंकुश वाघमारे, विजय दोरावत, अमीर पठाण आदी उपस्थित होते. त्याचबरोबर श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालयाचा सर्व स्टाफ यांचे बँकेच्या वतीने आभार मानण्यात आले.



तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाडिक वस्ती टेंभुर्णी या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद बघायला मिळाला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होता त्यांनी या उपक्रमाची माहिती मुलांना दिली व कोटक बँकेच्या सर्व स्टाफचे आभार व्यक्त केले.
Discussion about this post