जिद्द, मेहनत आणि सातत्य याच्या जोरावर श्रीगोंद्याच्या श्रृतीका बापू घोडके हिने मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळवत तीची अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचा अभिमान वाढला आहे.श्रृतीकाचे वडील बापू घोडके श्रीगोंदा नगरपरिषदेत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रृतीकाने कठोर परिश्रम घेतले आणि स्पर्धा परीक्षेच्या कठीण वाटेवर सातत्य ठेवत यश संपादन केले.
श्रृतीकाचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा सिद्धार्थ नगर, श्रीगोंदा येथे झाले. माध्यमिक शिक्षण श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय आणि उच्च माध्यमिक शिक्षण महादजी शिंदे ज्युनिअर कॉलेज, श्रीगोंदा येथे पूर्ण केले. पुढे सोनई येथील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर मधून २०२० साली तिने पदवी मिळवलीश्रृतीकाच्या यशाबद्दल माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विक्रम पाचपुते, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, आण्णासाहेब शेलार, त्याचबरोबर विविध संघटना,सर्व पत्रकार बंधू यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचे कौतुक केले श्रुतीका हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Discussion about this post