पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या समारंभाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी मा. पृथ्वीराज मोहोळ व प्रसिद्ध सिने अभिनेत्री स्वराज्य रक्षक संभाजी फेम – राणू अक्का अश्विनी महांगडे यांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. चंद्रकला हासे, प्रा. विजय घारे, डॉ. अर्जुन डोके, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. सतीश एकार, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पठारे, वरिष्ठ लिपिक अनुरिता गायकवाड, विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी लीना आडे, विद्यार्थी सांस्कृतिक प्रतिनिधी शिवम नटगिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण व्यक्तीमत्व विकासासाठी बाबुरावजी घोलप महाविद्यालय करत असलेल्या कार्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक करत या पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनामध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी मा. पृथ्वीराज मोहोळ व प्रसिद्ध सिने अभिनेत्री स्वराज्य रक्षक संभाजी फेम – राणू अक्का अश्विनी महांगडे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी कष्ट करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेषतः सिने अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सादर केलेल्या शिव गर्जनेने चैतन्यमय वातावरण निर्माण केले.आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी सदर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यामागील उद्देश सविस्तर स्पष्ट करत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शैक्षणिक, क्रीडा, संशोधन, प्रशासकिय कामे व सांस्कृतिक या विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रशासकिय सेवक या सर्वांचे अभिनंदन व कौतुक करण्यासाठी या समारंभाचे नियोजन असल्याचे स्पष्ट करत चालू शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या कार्याचा आढावा घेतला.या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, कार्यशाळा यामध्ये सादर केलेल्या शोधनिबंधांचे पुस्तक स्वरूपामध्ये प्रकाशन करण्यात आले. यावेळी तेजल महाजन हिला ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच ‘बेस्ट टीचर ऑफ द इयर’ म्हणून पुरूष गटातून डॉ. सतीश एकार तर महिला गटातून प्रा. अनुपमा कदम यांची निवड झाली. त्याचबरोबर ‘बेस्ट नॉन टीचींग ऑफ द इयर’ या पुरस्काराने पुरुष गटातून निलेश शिंदे व रामदास चिंचवडे तर महिला गटातून नीलम जगताप – रणपिसे यांचा सन्मान करण्यात आला. स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी पोवाडा, रॅप सॉंग, डान्स, मिमिक्री अशा विविध प्रकारामध्ये बहारदार अभिनयाचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. या समारंभाचे प्रास्ताविक डॉ. विद्या पाठारे तर सूत्रसंचालन डॉ. अमृता इनामदार, डॉ. सुवर्णा खोडदे, डॉ. शिवाजी शेळके, आभार प्रदर्शन डॉ. वंदना पिंपळे तर संपूर्ण छायांकन प्रणित पावले यांनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांचे काटेकोर नियोजन व वेळोवेळी केलेल्या महत्वपूर्ण सूचनेनुसार सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेत यशस्वी कार्यक्रम घडवून आणला.
Discussion about this post