(रावेर प्रतिनिधि) आदित्य गजरे
रावेर तालुक्यातील रसलपूर येथे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या १४ गोवंश बैलांची (अंदाजीत किंमत ३.७ लाख रुपये ) रावेर पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी हुसेन अब्दुल रहेमान तडवी आणि कादिर अब्दुल रहेमान तडवी . दोघे राहणार पाल. या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवार ११ मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास रावेर पासून जवळच असलेल्या रसलपुर जवळील आदिवासी आश्रमशाळेच्या परिसरात दोन इसम गोवंश घेऊन जात असल्याचे रावेर पोलिसाना निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता दोघेही आरोपी फरार झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी १४ बैल जातीचे गोवंश जप्त केले व त्यांना रावेर येथील द्वारकाधीश गोशाळेत सुरक्षित नेण्यात आले. गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली होती. त्या नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईसाठी मोहीम हाती घेतली.आरोपी हुसेन अब्दुल रहेमान तडवी आणि कादिर अब्दुल रहेमान तडवी . दोघे राहणार पाल. यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉ. सतीश सानप, पो.कॉ. संभाजी बिजागरे, राहुल परदेशी, होमगार्ड राहुल कासार यांनी केली.
Discussion about this post