
प्रा दिलीप नाईकवाड सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी)
साखरखेर्डा :- ता.१२/- येथून जवळच असलेल्या मौजे गोरेगाव येथील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्व अनुसयाबाई सुखदेव पांचाळ यांचे काल ता.११ रोजी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षं होते.मागील एक वर्षापूर्वी त्यांचे जेष्ठ पुत्र वासुदेव पांचाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.तर मागील दोनच महिन्यांपूर्वी त्यांचा भारतीय सैन्यदलात कार्यरत नातू सिध्देश्वर वासुदेव पांचाळ यांचे अपघातात अकाली निधन झाले होते.पती सुखदेव पांचाळ यांचा सुमारे ५० वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला होता.अशा परिसरातील कुटुंबाला हिंमतीने उभे करून त्यांनी कुटुंबाला उभे केले.त्यांच्या मृत्यूने पांचाळ कुटुंबाया सह गोरेगाव वाहिन्यांवर शोककळा पसरली आहे.गोरेगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर ता.११ते सायंकाळी ६.३० वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे रक्षा सावरण्याचा कार्यक्रम ता.१३ रोजी सकाळी ९.३० वाजता गोरेगाव येथे ठेवण्यात आला आहे.
स्व अनुसयाबाई सुखदेव पांचाळ,रा.गोरेगाव..
Discussion about this post