
माडग्याळ प्रतिनिधी..
जत तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्यामुळे पशुधनाला चारा मिळणे मुश्कील झाले असून ज्वारीच्या चाऱ्याला अधिक मागणी वाढली आहे. प्रति शेकडा दीड ते दोन हजार रुपये भाव असुन शेतकऱ्यांना पशुधन जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्यातील माडग्याळ, उमदी, संख, मुचंडी, या चार महसूल मंडळ अंतर्गत असलेल्या विविध गावांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र ऐन पिके जोमात असतांनाच रब्बी पावसाने ओढ दिल्याने उत्पादन घटले आहे.
तालुक्यात कधी पावसाने ओढ दिल्याने तर कधी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे जनावरांच्या चारा प्रश्न गंभीर बनला आहे. सद्या रब्बी हंगामातील ज्वारी गहू व हरभरा आदी पिके काढणीच्या आणि मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त आहे. मात्र ज्वारीच्या चाऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून ज्वारी कडबा प्रति शेकडा दीडते दोन हजार रुपये भाव मिळत आहे. त्यातच उन्हाळाच्या झळा वाढत असल्यामुळे व महागाईमुळे शेतकरी, पशुपालक हवालदिल झाला आहे. पशुधन जगविण्यासाठी
मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी कडब्याचे भाव वाढले आहे. पुर्ण उन्हाळ्यात पशुधनाला कसे जगवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे..
Discussion about this post