पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
भारतात स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट आणण्याची तयारी सुरू असून मंगळवारी एअरटेल ने इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स सोबत करार केल्याचे जाहीर करताच, बुधवार दिनांक १२ मार्च रोजी जिओ ने ही सोशल मीडिया साईट ‘एक्स’ द्वारे प्रसिद्धी पत्रक काढून स्पेसएक्स सोबत करार केल्याचे जाहीर केले.
या माध्यमातून स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटला भारतात आणण्याची तयारी केली असून स्पेसएक्स ला केंद्र सरकारने भारतात स्टारलिंक ची सेवा देण्यासाठी मंजुरी दिल्यास या कराराची अंमलबजावणी होऊ शकेल. जर केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर जून २०२५ पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

स्टारलिंक म्हणजे स्पेसएक्स द्वारे विकसित केलेली एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे. ही सेवा लो अर्थ ऑर्बिट (LEO) मधील उपग्रहांद्वारे हाय-स्पीड इंटरनेट पुरवते. स्टारलिंक च्या माध्यमातून च्या भागात पारंपारिक केबल किंवा फायबर इंटरनेट पोहोचू शकत नाही, तिथेही इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवता येईल. याचा स्पीड १५० एमबीपीएस पर्यंत असू शकतो.

Discussion about this post