करुन होलिकेला नमन* *केले व्यसनांचे दहन
आजराःसारथी महाराष्ट्राचा
होळीनिमित्त कणकवली मध्ये अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन.
सामाजिक न्याय, व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र मुंबई, शाखा सिंधुदुर्ग, आणि पदर प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने होळी निमित्ताने करून होलिकेला नमन, केले व्यसनांचे दहन हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
उत्सव आला की व्यसनही सोबत आलीच पाहिजत असा रिवाज अलीकडे मोठ्या प्रमाणात सगळीकडे सुरू आहे. हा रिवाज मोडीत काढून व्यसनांना प्रतिबंध घालून आनंददायी उत्सव साजरा करावा या उद्देशानेआज विशेष कार्यक्रमाचे कणकवली छत्रपती शिवाजी चौकात आयोजन करण्यात आले होते. *नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर*
यांनी व्यसनमुक्त महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र व्हावा व्यसनमुक्तीच्या कार्यात सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला तर राज्यातील सध्यस्थितीत व्यसनांची परिस्थिती भयावह आहे. सर्वांच्या सहकार्याने व्यसनांना अटकाव करता येईल . आपण जमलेल्या सर्व महिलांनी पुढाकार घेऊन घरा घरात जाऊन जनजागृती करावी असे मत व्यक्त केले.
यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व्यसनमुक्तीच्या ब्रँड अँबेसिडर अभिनेत्री अक्षता कांबळी आणि पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी
दारु, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थ, गांजा,अफू,गर्द , ड्रग्स,चरस यांची वेष्टणे , आवरणे या सर्व व्यसनांची प्रतिका्मक होळी पेटवली अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी समाजातील व्यसनांचा समूळ नाश होईल व महाराष्ट्र व्यसनमुक्त होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. असा विचार व्यक्त केला. या वेळी सर्वांनी व्यसनमुक्तीचा संकलप केला. मेघा गांगण यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात पुढाकार घेऊन व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आश्वासन यावेळी दिले.
कार्यक्रमात जिल्हा व्यसनमुक्ती समिती सदस्य तथा पदर महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेघा गांगण, प्रतिष्ठानच्या सचिव सुप्रिया नलावडे, प्रियाली कोदे, लीना काळसेकर, राजश्री रावराणे, संजना सदडेकर, भारती पाटील, प्रणाली चव्हाण, साक्षी वाळके, मनीषा मयेकर, पूजा माणगावकर, संपदा पारकर, अंकिता करपे, पल्लवी करपे, शांती सावंत, गोसावी मॅडम, स्वानंदी कोदे, याज्ञवी कोदे , महिला दक्षता समितीच्या रोजा खडपकर व्यसनमुक्त समिती सदस्य रीमा भोसले या सर्व महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Discussion about this post