पांडुरंग जगताप (धारूर प्रतिनिधी)
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज महत्त्वाचा ठरणार आहे.
दिनांक १५ मार्च पासून ते पुढील तीन दिवस म्हणजेच १८ मार्चपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहील, या दरम्यान उष्णतेत वाढ होईल, परंतु पावसाची शक्यता कमी आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच २४ मार्चपासून राज्यात अवकाळीचे सावट राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापनाची काळजी घ्यावी. गहू, ज्वारी, कांदा इत्यादी पिके काढायची असल्यास ती २४ मार्च पूर्वी काढून घ्यावीत.
विशेषता: नागपूर, भंडारा, गोंदिया, व तेलंगणा राज्य या भागांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी.
Discussion about this post