प्रतिनिधी: राजेंद्र टोपले
वांगण सुळे येथे होळी सण मोठ्या उत्साहात साजरा. आदिवासी परंपरेनुसार होळी सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला. सुरगाणा तालुक्यातील वांगण सुळे सह गावोगावी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा. आदिवासी संस्कृती ही जगाच्या पाठीवर एक आदर्श अशी संस्कृती समजली जाते. आदिवासी समाजात निसर्गाप्रति असलेले प्रेम व भावना यांचे एक वेगळेच नातं आहे. आदिवासी संस्कृतीत साजरे होणारे बहुतेक सण हे निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात.
आदिवासी समाजात डोंगऱ्यादेव नंतर होळी व शिमगा हे सण गाव, पाडा, व वस्तीत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. होळी जवळ आली की, कामधंद्याला बाहेर गेलेले सर्व आदिवासी बांधव आपल्या गावी परत येत असतात. त्यामुळे ओसाड पडलेले गावे पुन्हा गजबजून जात असतात.
होळी पेटवण्याचा मान हा गावचा पोलिस पाटील, जेष्ठ नागरिक, किंवा गावचा कोतवाल यांचा असतो. होळी पेटवली की ‘होळी पेटली रे पेटली अशा प्रकारच्या आरोळ्या देत असतात. त्यानंतर गावातील सर्व मंडळी आपल्या सोबत आणलेला नैवेद्य दाखवत असतात. व आमच्या कुटुंबाला सुखी ठेव अशी होळीजवळ प्रार्थना करतात.
होळी झेलण्यासाठी तरुण मंडळीत मोठा उत्साह असतो. होळीचा खांब खाली आला की तो वरच्यावर झेलला जातो. खांबांची राख किंवा मस टिळा म्हणून आपल्या कपाळी लावत व आपल्या नातेवाईक, मित्रबंधु नाही टिळा लावत भेटीगाठी घेत असतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात.
होळीच्या ठिकाणी रात्री पारंपरिक नृत्य, व ढोल पावरीच्या तालावर ठेका धरत जागरण करत असतात. अशा प्रकारे आदिवासी परंपरेनुसार होळी सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करत असतात.
Discussion about this post