सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक -२१.०३.२०२५
प्रमाणीक कष्ट आणि योग्य मार्गदर्शन दोन्हीचा मेळ जुळवून येतो तेव्हा असे रिजल्ट दिसु येतात. हे सत्यात उतरेल आहे.
बाभुळगाव येथे विकसनशील प्रगतशील शेतकरी हरीश पोपट गोरे यांनी प्रत्यक्ष करू दाखवले आहे.
हरीश गोरे हे गेले नऊ वर्षे झाली डाळिंब क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, यशस्वी डाळिंब मास्तर म्हणून ओळख निर्माण केली आहे. विविध भागातील शेतकरी वर्ग डाळिंब उत्पादक खरबूज पीक हे खुप संवेदनशील पीक आहे तेव्हा आपण पण नक्की यशस्वी होऊ म्हणून २३ डिसेंबरला अडीच एकर जमीन मध्ये लायलपुर या जातीच्या १४०० रोपाची लागवड केली.
हरीश गोरे यांनी सांगितले खरबूज शेतीमध्ये ६०दिवसात मध्ये रोज खरबूज शेतीमध्ये जावु योग्य नियोजन पाणी, खत, फवारणी याचा अंदाज घेऊन खरबूज शेतीमध्ये जैविक पध्दतीने नियोजन केले त्यामुळे मधमाशी मुळे एकाच वेळी सेटिंग झाले व सर्व माल हा बेड वर आहे तसेच आकार रंग चांगला आहे. खरबूज रोप, लागवड, फवारणी, खत, मजुर इत्यादी सर्व खर्च २. २५लाख आली.
खरबूज मार्केट गोवा, केरळ ला माल गेला. निव्वळ नफा ७.२५लाख फक्त ६०दिवसामध्ये झाला आहे.
शेतकरी हा मनापासून कष्ट आणि चिकाटी तसेच योग्य नियोजन असेल तर नक्की यशस्वी होतोय हे हरीश गोरे यांनी सिद्ध करू दाखवले आणि युवा शेतकरीवर्गात नवचैतन्य निर्माण केले आहे. पंढरपूर तालुका न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रात खरबूज शेतीमध्ये यशस्वी झाले याबद्दल प्रगतशील हरीश गोरे याची सर्वत्रच चर्चा होत आहे.
शेतकरी वर्गाकडून अभिनंदन केले जात आहे.
युवा शेतकर्यांना संदेश दिला आहे.
प्रमाणीक पण कष्ट करणं थांबु नका,
कारण येणारा काळ तुमचाच आहे.
Discussion about this post