नसरापूर: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या प्रसंगी भोर, वेल्हा, मुळशी तालुक्याचे आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ, मा. श्री. सु. ल. खुटवड उपसंपादक सकाळ वृत्तपत्र, मा. श्री. एल.एम.पवार सर उपसचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या वेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे सर सर्व प्राध्यापकवर्ग कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पु.जि.शि.मंडळाचे संस्थापक स्व . बाबुरावजी घोलप साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, नाटिका आणि विविध कलाविष्कारांनी संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. महाविद्यालयातील खेळाडूंनी आणि कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिभाशाली कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.पारितोषिक वितरण समारंभात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. सकाळ वृत्तपत्राचे उपसंपादक मा. श्री. सु. ल. खुटवट यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत म्हणाले की, “शिक्षणासोबतच खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, भविष्यातही यशाची नवनवी शिखरे गाठावीत.” अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या. महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “शिस्त, मेहनत आणि जिद्द या त्रिसूत्रीच्या आधारे यश मिळवता येते. विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळत आपल्या स्वप्नांची पूर्तता करावी.”कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समितीने, प्राध्यापक वर्गाने आणि विद्यार्थी संघटनांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रशंसा केली. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपली कला आणि कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली, आणि संपूर्ण महाविद्यालय परिवाराने हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
Discussion about this post