प्रतिनिधी विजय बारस्कर
आज दी.. 24 3 2025 रोजी मंगलादेवी येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम क्षयरोग दुरीकरण प्रतिज्ञा घेण्यात आली त्यानंतर उपस्थित नागरिकांनी टीबी आजाराबाबत मार्गदर्शन तसेच लक्षणे याबाबत माहिती देण्यात आली टीबीचा प्रसार रोखण्याकरिता नागरिकांनी तसेच टीबी मुक्त भारत करण्याकरिता व टीबीमुक्त ग्रामपंचायत होण्याकरिता नागरिकांनी स्वयंपुरतीने सामोरे येऊन आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांना सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच टीबी रुग्णांना त्यांचे मनोबल वाढविण्याकरता तसेच सहकार्य म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी निश्चय मित्र होण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला गावातील माननीय उपसरपंच गणेश बेले तसेच गावचे पोलीस पाटील विनोदराव कापसे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विजय बारस्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या हा कार्यक्रम आरोग्य सहाय्यक व्ही एस मोहने व श्रीमती आडोळे आरोग्य सेविका तसेच आशा वर्कर गोल्हर ताई उघडे ताई कापसे ताई यांनी कार्यक्रम घेतला.
Discussion about this post