सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – 24.03.2025
राजमाता जिजाऊ यांच्या रथ यात्रेच्या समवेत मा.सौरभ दादा खेडेकर, आमची व्याही मा. दिनेश जगदाळे साहेब मा. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप आणि सर्व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ वर प्रेम करणारे तरुण मित्र महिला भगिनी उपस्थित होते.
तांबवे तालुका माढा येथे आगमन झाल्यानंतर राजमाता जिजाऊ च्या रथाचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करताना माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. नागेश (बापू) खटके-पाटील,मा. बाळासाहेब खटके पाटील ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव युवक नेते कैलास माने, माढा तालुका व्यसनमुक्ती युवक संघटनेचे सचिव सागर खटके, रामदास जाधव ,विशाल जाधव,
तांबवे गावच्या माजी उपसरपंच शांताबाई खटके, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि जिजामाता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.निकीता नागेश खटके, सौ.सुनंदा खटके , सौ दिपाली खटके, सौ. लतीका खटके सौ.प्रांजली खटके सौ,राणी कोल्हे सौ.सुषमा कोल्हे, सौ. शैला जाधव सौ. तारामती कांबळे, तरुण मित्र आणि महिला, माता भगिनी यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ च्या रथाचे तोफाची सलामी देऊन पुष्पहार अर्पण करून भव्य आणि दिव्य अशा प्रकारे स्वागत करण्यात आले.
ही रथयात्रा वेरूळ ते लाल किल्ला पुणे अशी 45 दिवसाची जनजागृती यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व मराठा बांधवांना एकत्रित करण्याच्या निमित्ताने सर्वांना बरोबर घेत संबोधित करत मार्गक्रमण करत आहे,
याचा उद्देश आणि हेतू हा आहे की यानिमित्ताने सर्व बहुजन समाज बांधव एकत्र करणं आणि राजमाता जिजाऊ चे विचार सर्वच् तरुण पिढीपर्यंत माता-भगिनी पर्यंत पोहोचवणे हाच खरा उद्देश आणि संकल्पना या रथयात्रेच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवते.
“”जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे,””
Discussion about this post