

शिरूर तालुका प्रतिनिधी:-
शिरूर, 23 मार्च 2025: शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने 23 मार्च 2025 रोजी शिरूर शहरातील बाजार मस्जिद येथे रमजान महिन्याच्या अनुषंगाने मुस्लिम समाजासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिरूरच्या विविध प्रतिष्ठित व्यक्ती आणि शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, मौलाना कैसर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, माधव सेनेचे रवींद्र सानप, भाजपाचे प्रवीण मुथा, प्रवासी संघाचे अनिल बांडे, बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड, आणि मनसेचे शहराध्यक्ष ॲड. आदित्य मैड यांच्यासह शिरूर शहरातील अनेक मान्यवर या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर शहराच्या सलोख्याची आणि एकोप्याची परंपरा अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, रमजान महिना शांतीचा, प्रेमाचा आणि ऐक्याचा संदेश देतो.
नुकत्याच झालेल्या नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर शिरूर पोलीस स्टेशनने जातीय सलोखा आणि दोन्ही समाजांमधील भाईचाऱ्याचे महत्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम आयोजित केला. शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने यापुढेही अशा कार्यक्रमांचे आयोजन सुरू ठेवले जाईल, ज्यामुळे शहरातील शांतता आणि सलोखा कायम राहील.

Discussion about this post