गोंडवाना गोटूलसाठी वेकोलीकडून पुनर्वसन क्षेत्रात जागा उपलब्ध

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:- सुगत गेडाम पोंभुर्णा, चंद्रपूर
राष्ट्रीय क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त आयोजित समाज प्रबोधन तथा पारंपारिक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे, महामंत्री शुभम गेडाम, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, सुरज पेद्दूलवार, रामपाल सिंग, पुरुषोत्तम सहारे, कृष्णाताई गेडाम, जिवनकला मांडवकर, विक्की मेश्राम आदींची उपस्थिती होती.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदिवासी समाज अतिशय सात्विक, प्रामाणिक आणि कष्ट करणारा पराक्रमी समाज आहे. नवीन मसाळा, ऊर्जानगर येथे गोंडवाना गोटूल आदिवासी प्रार्थनास्थळासाठी जागा मिळावी यासाठी येथील आदिवासी बांधवांची मागणी होती. याकरिता आदिवासी बांधवांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या मागणीला यश आले असून, वेकोलीच्या माध्यमातून पुनर्वसन क्षेत्रात प्रार्थनास्थळासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आदिवासी समाजाने मोठ्या संघर्षानंतर विजय मिळविला आहे.
Discussion about this post