पतीने जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले, सासऱ्याने बलात्कार केला आणि सासू आणि नंदांनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी बारामती पोलीस शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२२ ते जानेवारी २०२४ यादरम्यान बारामती तालुक्यातील त्रिमूर्तीनगर येथे हा प्रकार घडला.एका २५ वर्षीय विवाहितेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती मनोज विष्णू सांगळे, सासरा विष्णू जालिंदर सांगळे, सासू नंदा विष्णू सांगळे (सर्व रा. त्रिमूर्तीनगर, ता. बारामती, जि. पुणे), नणंद पूजा संदीप वणवे आणि प्रियंका उर्फ स्वाती माधव वणवे (रा. लाकडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता सध्या तिच्या माहेरी राहते. जानेवारी २०२२ मध्ये तिचे लग्न झाले होते. मात्र लग्नात केवळ पाच तोळे सोने दिले आणि फर्निचर हलक्या दर्जाचे दिले म्हणून सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेला माहेरून आणखी पाच तोळे सोने घेऊन येण्यास सांगितले. तसेच जाणीवपूर्वक घरातील सगळी कामे पीडितेकडून करून घेण्यात येत असे.पती मनोज पीडितेकडे अनैसर्गिक संबंधांसाठी आग्रह धरीत होता. नकार दिला असता पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिला गच्चीवरून ढकलून देण्याची धमकी दिली जात असे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास सांगण्यात आले. तसेच तिला नांदवणार नसून बाळाला एकटीलाच सांभाळावे लागेल, असे सासरच्या लोकांनी तिला सांगितले.*सासऱ्याकडून बलात्कार*दरम्यान, पीडिता आपल्या मुलाला रात्री झोपी घालत असताना सासरा विष्णू सांगळे तिच्या खोलीत घुसला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. तसेच कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच पीडितेने हा प्रकार सासूला सांगितला असता तिनेही गप्प राहण्यास सांगितले. भीतीपोटी तिने कोणालाही झाल्या प्रकाराबाबत सांगितले नाही.*सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल*अहिल्यानगर येथे भरोसा सेल येथे अर्ज दिला असता पीडितेच्या सासरचे लोक फक्त एकदाच समुपदेशनच्या तारखेला आले. त्यानंतर पीडितेने आईवाडिलांसह बारामती शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासू-सासरा आणि दोन नणंद यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Discussion about this post