फलटण: श्री विठ्ठल मंदिर, फलटण येथे शिंपी समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत नागपूर येथे होणाऱ्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नई दिल्ली चे
- राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री भास्करराव टोम्पे साहेब
- राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. श्री ईश्वरभाऊ धिरडे साहेब
- राष्ट्रीय समन्वयक मा. श्री अनंतभाऊ जांगजोड साहेब
- महिला संघटक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ. श्री दिनकरराव पतंगे
- श्री संतोषभाऊ मुळे (ना.स.प. सातारा जिल्हा)
- नामप विश्वस्त उषाताई पोरे
- सामाजिक कार्यकर्त्या मीनल कुडाळकर
यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला आणि समाज संघटन, एकात्मता, तसेच संत नामदेव महाराजांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारावर मार्गदर्शन करण्यात आले.

नागपूर अधिवेशनाची तयारी जोमात
या अधिवेशनात देशभरातील शिंपी समाजातील सर्व पोटजातींना एकत्र आणण्याचा निर्धार करण्यात आला. सुमारे ५ लाख समाज बांधव एकत्र येणार असून, या अधिवेशनात देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व इतर मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख निश्चित करून जाहीर करण्यात येणार आहे.
शिंपी समाजाच्या मागण्यांवर भर
अधिवेशनात शिंपी समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून त्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. समाज संघटित करून संत नामदेव महाराजांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
“चला नागपूर – राष्ट्रीय एकात्मतेसाठी!”
बैठकीत “संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन… चला नागपूर…. राष्ट्रीय एकात्मतेसाठी…. संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी!” हा नारा देण्यात आला. फलटण शहरातील सर्व पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post