आहिलयानगर, जिल्हा लातूर: प्रख्यात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल (रा. पारगाव, ता. श्रीगोंदा, जि. आहिलयानगर) यांची लातूर नगरी वार्ता प्रतिनिधीपदी निवड करण्यात आली आहे.
पत्रकारितेतील योगदान आणि समाजसेवा
नंदकुमार बगाडेपाटिल यांनी विविध वृत्तपत्रे, साप्ताहिक आणि मासिक दैनिकांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे.
ते राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पत्रकार असून, त्यांनी शासकीय योजना, वैद्यकीय मदत, जेष्ठ नागरिक सेवा आणि सामाजिक कार्यांमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेवरील अन्याय-अत्याचार उघडकीस आणत त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.
निवडीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव
नंदकुमार बगाडेपाटिल यांच्या निवडीचे आहिलयानगर व संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार बांधवांकडून आणि सामाजिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
याबद्दल पारगाव येथे ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच मंगेश घोडके व मित्र मंडळाच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.
“न्याय आणि सत्यासाठी कार्यरत राहणार”
निवडीच्या निमित्ताने नंदकुमार बगाडेपाटिल यांनी “सत्य आणि न्यायासाठी पत्रकारिता करत राहण्याचा निर्धार व्यक्त” केला आहे.
लातूर नगरी वार्ता संपादक आणि संपूर्ण टीमकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Discussion about this post