प्रतिनिधी: सुशील पवार, डांग
सापुतारा ते मालेगाव घाट मार्गावर मासे वाहून नेणारा डी-फ्रीझर टेम्पो अपघातग्रस्त झाला. या घटनेत टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून मासे रस्त्यावर विखुरले गेले.
प्राप्त माहितीनुसार, नाशिक येथून मासे घेऊन सुरतकडे निघालेला टेम्पो मालेगाव घाटातील फॉरेस्ट रेस्ट हाऊसजवळील यू-टर्न वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक भिंतीला धडकला आणि पलटी झाला. या भीषण अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातात टेम्पो चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून, घटनास्थळी उपस्थित होमगार्ड, जीआरडी जवान आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या शामगव्हाण सीएचसी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या असून अधिक तपास सुरू आहे.
Discussion about this post