जांब/वार्ताहर.एप्रिल महिन्यात कडाक्याची ऊन असतो व तळे विहिरी पूर्ण पने आटलेले असतात.या कडाक्याच्या उन्हात सुद्धा बागायती शेती करणारे शेतकरी भाजीपाला पिकांची शेती करत असतात. पण ९ एप्रिल ला अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने किमान ३ तास थैमान घातले मात्र ह्या पावसाने बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटात टाकला आहे.जांब,लोहारा,सोरणा,कांद्री, लंजेरा,देऊळगाव, व परिसरातील अनेक गावात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते,ह्या भागातील शेतकरी कशी तरी बागायती शेती करून भाजीपाला विकून रोजमरराचा जीवन जगत असतात.
मात्र ९ एप्रिल ला आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शेतकऱ्यांचे पीक अस्तावेस्त केले व जोरदार वाऱ्याने भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अवकाळी पावसाने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. धान उत्पादका साठी मोलाचे तर भाजीपाला पिक उत्पादकांसाठी काठीनायीचे दिवस आले आहेत.पुढे सुद्धा अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो.मोठ – मोठ्या आंब्याच्या बागायती सेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.लहान लहान आंबे व आंब्याचा बार जोरदार वाऱ्यामुळे खाली पडले त्या मुळे ह्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातील घास हिस्कवल्याचे दिसत आहे.

Discussion about this post