बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव या गावात श्री मारुतीराया हे देवस्थान ऐतिहासिक देवस्थान आहे व हेच गावचे भूषण आहे. आणि या श्री हनुमान देवस्थान ची प्राणप्रतिष्ठा जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते झाली आहे असे जुने जाणकार सांगत आहेत विशेष म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात अखंड दिप चालू असतो. व या ठिकाणी वर्षांमध्ये २०ते २५ वेळा अकरा ब्राम्हण यांचा अभिषेक होतो श्रावण महिनाभर तर भाविक भक्त येत असतात शनिवारी श्री हनुमान रायाचा यांचा वार असल्याने भक्तगण मोठ्या प्रमाणात येतात.
या देवस्थानचा इतिहास सांगणारे साक्षीदार आज गावात नसले तरी याबद्दल आजतागायत आम्ही पहात आहोत की काही वयोवृद्ध व्यक्ती आजही गावात आहेत याठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव जयंतीच्या निमित्ताने मंदिरात भाविकांची गर्दी असते सर्व महाराष्ट्रातील भाविक भक्त येथे येतात अशा अनेक शहरांतुन भाविक भक्त दररोज सुद्धा येतात व पुजा, अभिषेक करतात.
गावक-यांची अपार श्रद्धा या श्री हनुमान देवस्थान वरती खूप प्रमाणात आहे गावातुन कोठेही गेलेला मनुष्य वर्षातुन एकदा तरी मंदिरात नतमस्तक होण्यासाठी आवश्यक येतात श्री हनुमान देवस्थान हे नवसाला पावणारे आहे
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पालखी गावातून टाळ मृदंगाच्या गजरात वाजत गाजत गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येते शुक्ल पक्षाच्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी (हिंदू महिन्याप्रमाणे) संकटमोचन, श्री हनुमान यांचा जन्म झाला आणि त्यादिवशी जन्मोत्सव साजरा केला जातो. गेल्या ६८ वर्षापासून अखंड हरिनाम समाह श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने प्रारंभ केला जातो यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, प्रवचनकार, गायनकार यांची मांदियाळी गावाला लाभते आजतागायत परंपरा कायम सुरू आहे मंदिर जमिनीपासून ते कळसापर्यंत ५०ते ६० फुट ऐवढे आहे हेच मंदिर जवळपास पंचक्रोशीतील सर्वात मोठे म्हणून संबोधले जाते
गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा अशी की या मंदिराचे पुजारी म्हणून गोसावी समाजाचे आहेत आणि श्री हनुमान जन्मोत्सव यादिवशी नवस बोलला जातो गावातील लेकी सुना नातवंडे नातलग व अन्य पाहुणे मंडळी नवस बोलतात आणि पुढच्या जन्मोत्सव जयंतीच्या निमिताला ते पुर्णच होतो. या वेळी गुळाची शेरणी वाटली जाते व ज्या मुलांचा मुलींचा नवस आहे त्यास नवा कपडा ड्रेस घेतला जातो
टॉवेल, टोपी, साडी दिली जाते बारा गाड्या ह्या गावच्या वेशीपासुन ओढुन श्री हनुमान देवस्थान मंदिरासमोर आणल्या जातात विशेषतः या मंदिराचे द्वार पश्चिम दिशेला आहे आणि आतमध्ये श्री मारुतीराया यांची मुर्ती दक्षिणमुखीस जाताना दिसत आहे आणि नवस फेडण्यासाठी बारा गाड्या ओढल्या जातात अन् लहान मुल यांच्या नावाने त्याला खांद्यावर घेऊन दहा ते बारा फुट वडील, मामा, काका, अशा व अनेक प्रकारे नातेवाईक यांच्या हस्ते ओढल्या जातात व त्या बारा गाड्या ओढतांना विशेष करून ज्या मुलांच्या नावाने नवस असतो त्याला आपल्या खांद्यावर घेऊन ओढल्या जातात
व त्या सर्व बारा गाड्यांची एक साखळी पद्धतीने बांधवणुक केलेली असते व त्यामध्ये प्रेक्षक मंडळी बसुन त्या ओढल्या जातात. त्या दिवशी ज्या मंडळींनी नवस बोलला आहे त्यांच्या घरी पवित्र पुरण पोळी, आमटी, भात अशा प्रकारे नैवेद्य दाखवून बारा गाड्या ओढल्या जातात. दुपारी गावातील उत्तम एकुण बारा चांगल्या प्रकारे बैलगाडी गोळा केल्या जातात साधारणतः १११ ते २११ नवस असतात.
संकल्पना:-
श्री त्रिंबक बाबुभाऊ कोकाट
संकलन:-
चि समाधान हनुमान सम्राट
संध्याकाळी सहा ते सात वाजता या सर्व गाड्या मंदिर परिसरात येतात. आणी मग जेवनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो
व श्री हनुमान देवस्थान हे आपल्या गुडधी/डबरा गुडया सुजणेसाठी प्रसिद्ध देवस्थान आहे येथे पाच शनिवारी सकाळी येऊन स्नान करून महिला असेल तर धोतर धारण करून ओल्या अवस्थेत मंदिर द्वाराबर नतमस्तक होऊन व गुडघा ठेवून पाय पड़तात. आणी पाच प्रदक्षिणा गोल रिंगण घालतात पाचव्या शनिवारी अभिषेक केला जातो व मंदिरात फक्त पुरुषच जातात महिला या फक्त मकर संक्रांत यादिवशी आत प्रवेश करतात आणि साधारण पुर्वज देखील या गुडघा सुजणे यास डवरा मारोती असेही बोलत असत..
Discussion about this post