कै. विश्वतेज (विकि) विजय निकत यांच्या स्मृति पित्यर्थ रक्षामध्ये वृक्षारोपण करून आयुष्यभर स्मृति जपण्याचा भावनीक उपक्रम निकत कुटुंबियानी केला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार व पोलीस पाटील विजय निकत यांचे थोरले चिरंजीव विश्वतेज वय १५ यांचे आल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांची निरंतर आठवण प्रेम व सहवास रहावा म्हणून त्यांच्या हस्ती व रक्षा झाडाच्या बुंध्याशी टाकून आंब्याचे रोप लावले असून त्या रोपाची नित्य नियमाने काळजी घेऊन वटवृक्षा मध्ये रूपांतर करण्याचा संकल्प निकत कुटुंबियानी केला असून या वृक्षाच्या रूपाने आपल्या लाडक्या मुलाच्या स्मृति जपण्याचा अनोखा उपक्रम या निमित्ताने केला आहे यावेळी मकाईचे माजी चेअरमन व बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल संचालक रेवणनाथ निकत मा. सरपंच आप्पासाहेब कोलते चंद्रशेखर जगताप रघुनाथ निकत प्रा राजेंद्र निकत गणपत मगर सरपंच युवराज मगर विनोद सरडे स्वप्निल गोडगे कैलास पाखरे पत्रकार नरेंद्र ठाकुर ग्रंथालय कार्यकर्ते संजय मोरे मनोज ढेरे डॉ अशोक शेळके पोलीस पाटील सुरेश माने राजेंद्र पाटील हरिश्चंद्र घरत तुकाराम वारगड अतुल राऊत शांतिलाल जगदाळे अँड राजेंद्र पवार सुरेश शेजाळ हभप रघुनाथ पाटील नवनाथ मोरे व विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते ..
Discussion about this post