प्रतिनिधी : राजेंद्र टोपले, सुरगाणा
आदिवासी भाग म्हटला की, तिथे डोंगराळ भाग येणार आणि तिथे डोंगराळ भाग असल्याने वेगवेगळ्या प्रजातीच्या वनस्पती सृष्टी, वेली, रानमेवा, रानभाज्या, रानफळे या सर्वांचे आदिवासींना निसर्गाने दिलेला एक वरदानच आहे . आदिवासी भागातील बांधवांना जंगलातील वनस्पती बरोबरच रानफळांचेआस्वाद हे वसंत ऋतूत चाखायला मिळत असतात. यापैकी एक म्हणजे करवंद हे फळ पिकून काळ्या रंगाने झाडावर बहरून गेलेली असतात.करवंदाला डोंगराची काळी मैना असेही संबोधले जाते. करवंदे पिकली असता जंगलातील विविध प्रकारचे पक्षी त्या झाडावर घिरट्या मारत करवंदावर यथेच्छ ताव मारत असतात, आवडीने खातात. आदिवासी भागात अनेक वनस्पतींवर आधारित लोकगीते गायली जातात. त्यामध्ये अनेक वनस्पतींचा, झाडांचा, पक्षांचा, प्राण्यांचा उल्लेखही केला जातो. साधारणतः जानेवारी महिन्यापासून करवंदाच्या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले येतात. त्याला हिरव्या रंगाची लहान लहान फळे येतात. एप्रिल ते मे महिन्यात करवंदे हे रानफळ पिकून झाड पूर्णपणे काळ्या रंगाच्या फळांनी भरून जाते. हे फळ आंबट, गोड, कडू अश्या वेगवेगळ्या चवीची असतात. ते मोठ्या प्रमाणात आढळतात. कच्चा फळापासून खारना,लोणच असे पदार्थही बनवतात.
आदिवासी भागात जवळपास डिसेंबर महिन्यापासुन लग्न सराईला सुरुवात होते. या लग्न समारंभात आदिवासी बांधव हा पिढ्यानपिढ्या जंगलात राहत असल्याने निसर्गाप्रति असलेले प्रेम, भावना ह्या या कार्यक्रमात लोकगीताच्या माध्यमातून दिसून येत असते.आदिवासी महिलांच्या तोंडुन या लग्नकार्यात वेगवेगळी लोकगीते गायली जातात.
Discussion about this post