● जोगेंद्र जाधव ( कल्याण) वाचकांनो आज मी आपल्याला कल्याणच्या तिसाई आई या देवस्थानाबद्दल माहिती देत आहे. महाराष्ट्रात अनेक तिर्थक्षेत्र आहेत त्यापैकी कल्याण मधील तिसगांव या गावी तिसाई देवी अर्थात जरीमरी माता बसलेली आहे.
महाराष्ट्रातील संपुर्ण आगरी कोळी समाजाची दैवत म्हणुन यादेवी कडे पाहिले जाते.महाराष्ट्राची राजथानी मुंबईपासून सुमारे ५५ ते ६० किलोमिटर अंतरावर ठाणे जिल्हातील ऐतिहासिक अशा कल्याण शहरातील तिसगांव नांवाचे खेडे आहे. या गावात सुमारे २०० वर्षाचा इतिहास आहे. देवीची मुर्ती ही स्वयंभू आहे. अशी आख्यायिका आहे की तिसगावात गणा नावाचा एक गावकरी आपल्या मित्रमंडळींसह गुरे-ढोरे चारण्यासाठी गावाजवळीलएका टेकडीवर गेला होता. अचानक जोराचे वादळ सुरू झाले. त्यामुळे सर्व गुरे राखणारे सवंगडी आणि त्या सर्वांची गुरे एकत्र जमा झाली.
या सर्व घोळक्यात गणा गायकवाड ही होता. खुप सोसायट्याचा वारा सुरू होता तसेच विजांचा कडकडाट सुरू असतांना गणांच्या कानात एक आवाज ऐकु आला “गणा मी आदिमाया देवी शक्ती आहे मी गावाजवळील तळयात मध्यभागी पाषण रूपात आहे’ मला बाहेर काढ आणि माझी पुजा कर” गणाच्या कानावर हा ध्वनी ऐकु येताच तो भांबवला आणि आपल्या सोबत असलेल्या सव्रगड्यांना त्यानी ती बातमी सांगीतली व नंतर सर्वांनी मिळून ती घटना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सांगुन या गावात गावक-यांची बैठक झाली आणि गणा सांगतोय त्याप्रमाणेदुसऱ्या दिवशी शोध घेण्यासाठी काही ग्रामस्थ गावांजवळील तळ्यांत देवीचा शोध घेण्यासाठी तळयात उतरले त्यात गणासुध्दा होता.
गणाच्या डोळयासमोर तलावात असलेली देवी दिसत होती. वादळाात ऐकलेले शब्द गणाला वारंवार ऐकु येत होते. तळयाच्या मध्यभागी जाउन गणाने तळयात बुडी मारली आणि गणा देवीची पाषाण स्वरूपातील मूर्ती घेउनच वर आला. मूर्ती पाहुन सर्व गावकऱ्यांना आनंद झाला. अशाप्रमारे तिसगावात देवी जरी मरी माता प्रगट झाली. ही बातमी जेव्हा सर्व गावकऱ्यांना समजली तेव्हा तिसगांवामध्ये लांबून लोक दर्शनासाठी येउ लागले. सर्व गावकऱ्यांनी एका शुभदिना देवीची स्थापना केली आणि कौलारू मंदिर बांधले. त्यादिवसापासुन गणा गायकवाड गणा भगत म्हणून ओळखला जाउ लागला.
त्यानंतर पुढे राघो गायकवाड भगत झाला त्यावेळी बंदिस्त मंदिराचे दरवाजे आपाआप उघडले गेले होते. हळुहळू जरीमरी देवीचा महिमा सर्वदूर पसरला महाराष्ट्रातुन तसेच महाराष्ट्रा बाहेरूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी तिसगावात येउ लागले. तिसगावात वर्षातुन एकदा देवीची जत्रा भरते.
जत्रेला भाविक खुप गर्दी करतात. नवसाला पावणारी देवी म्हणुन तिसगांवच्या जरीमरी मातेची ओळख आहे. आपणही एकदातरी या देवीचे दर्शन घेउन यावे.
Discussion about this post