
सिल्लोड :
श्री.गणेश शिक्षण प्रसारक मंडळ तळणी संचालित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळणी येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आले.विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था प्रतिनिधी सतीश देशमुख तर प्राचार्य श्री.अशोक गरूड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे यांनी
बाबासाहेबांच्या राष्ट्रविषयक संकल्पनांचे विस्तृत विवेचन करत नवीन शैक्षणिक धोरण २०२० आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या शैक्षणिक धोरणाची तुलना केली. त्यांनी स्पष्ट केले की भारतातील कोणत्याही नागरिकाला मुलाला कुठल्या शाळेत घालावे, उपचारांसाठी कुठले हॉस्पिटल चांगले किंवा कोणती महानगरपालिका स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवते असे प्रश्न पडू नयेत तरच खरे राष्ट्रनिर्माण होईल आणि तीच खरी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्री.अशोक गरूड यांनी वाचाल तर वाचाल या विचारावर प्रकाश टाकला आणि महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह यांसारख्या ऐतिहासिक घटनांची माहिती दिली.
चातुर्वर्ण्यव्यवस्था नष्ट करणे व निकोप व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी जातविरहित समाज व्यवस्था निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post